इस्लामपूर येडेमच्छिंद्रगड (ता. वाळवा ) हद्दीतील ओढ्यावरील विद्युतपंप चोरट्यानी लांबवला. हा चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी मानसिंग पाटील यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काही दिवसांपासून ताकारी, बोरगाव, बहे, शिरटे आदी परिसरातून विद्युतपंप, केबल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.सततच्या चोरीच्या प्रकाराने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकरी तक्रारी देण्यासाठी आले असता त्यांचीच पोलिस उलट तपासणी घेत आहेत. पोलिसांच्या या कार्यप्रणालीने शेतकरी संतप्त आहेत.
येडेमच्छिंद्रगड परिसरातून विद्युतपंप चोरीला
