विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात!

आटपाडी तालुक्यातील दिघंचीतील ढोक येथे महावितरणचा डीपी आहे. फुले शाहू आंबेडकर चौकातील हॉटेल, किराणा, बेकरी, पानपट्टी, खासगी कार्यालय, ढोकमळा, साईनगर, सिद्धनाथ नगर, आटपाडी रोडवरील असणारा परिसर तसेच पंढरपूर रोडवरील असणारे पथदिवे यांना याच डीपीवरून वीज पुरवठा सुरु होता.

मात्र दररोज सायंकाळी सातच्या पुढे डीपीवर भार वाढल्याने विद्युत पुरवठा खंडित होत होता. सातत्याने घरगुती उपकरणे जळण्याचे प्रकार घडत होते. ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत व महावितरणकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन ग्रामपंचायतने वितरण कंपनीकडे लेखी पत्राद्वारे येथील विजेचा प्रश्न सोडवा, अशी मागणी केली होती.

सुहास बाबर व तानाजी पाटील यांच्याकडेही पाठपुरावा केला होता याची दखल घेत सुहास बाबर यांनी नवीन ट्रान्सफर बसवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या, त्याप्रमाणे येथील असणारा १०० केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बदलून या ठिकाणी नवीन २०० केव्हीचा ट्रान्सफार्मर बसविल्याने वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपीचा निकाल निघाला आहे.