आटपाडी मध्ये जवळजवळ १७ वर्षे अथकपणे, पायाला भिंगरी बांधून अखंड महाराष्ट्रातील मराठा बहुजन, अल्पसंख्यांक, उपेक्षित वंचितांचा हुंकार बनत,प्रस्थापितांविरोधात बेधडकपणे बुलंद आवाज करत कायमच अन्यायाविरोधात धडाडणारी तोफ म्हणजे आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी गावचे सुपुत्र गोपीचंद पडळकर साहेब. अत्यंत कमी वयात आपल्या धाडसी व अभ्यासू वक्तृत्वशैलीने कामाच्या जोरावर व जन सामान्यांचा आधार बनून भल्या मोठ्या प्रस्थापितांची झोप उडवली, अन्यायाविरुद्ध धाडसाने आवाज उठवीला लोकांच्या प्रत्येक कामाला न्याय दिला ! प्रचंड आत्मविश्वास, छोट्या गावातून व सामान्य कुटुंबातून येऊन, परकोटींचा संघर्ष करत, मा.आ.गोपीचंद पडळकर साहेबांनी अखेर स्वतःच स्वप्न खरं केलंच तसेच आमच्या सारख्या कार्यकत्याच्या मनात यासारख्या अनेक स्वप्नांच बीज पेरलं. असे युवा नेते विनायक पाटील व पंकज काळेबाग यांनी प्रतिपादन केले.
पुढे म्हणाले की, पडळकर यांनी गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी २०१२ साली जत तहसिल कार्यालयावर सर्वप्रथम मोर्चा काढला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून नेहमी लढत, ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण व्हावे म्हणून आवाज उठवला याबरोबर शिक्षण, आरोग्य, एस टी कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी अंगणवाडी सेविका, आशावर्कर गावगाड्यापासून लमाणतांड्यापर्यंत सर्वच छोट्या मोठ्या समाजघटकासाठी कार्यरत राहिले, शेती व शेतकऱ्यांसाठी राजेवाडी तलाव फोडला, टेंभूचे कार्यालय फोडले, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढवली गोरगरिबांना न्याय देणारा, अहोरात्र झटणारा , प्रसंगी जनसामान्यांसाठी जेलवारी आनंदाने स्वीकारणारे महाराष्ट्रातील तरुणांच्या माझा आटपाडी खानापूर तालुका म्हणजे राजकीय व सामाजिक जीवनाचा पाया समजणारे त्यात दगडाची भर घालत सर्व धनगर मजबूत पायावरती उभा रहावा. महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज त्याच्यावरती घातलेला स्लॅब म्हणजे पक्षाने व नेतृत्वाने केलेला आदर आणि त्या मंदिराचा कळस म्हणजे जत मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनी ! अशा सकारात्मक ऊर्जास्त्रोत असलेल्या उदयोन्मुख व महत्वाकांक्षी नेतृत्वास आदरणीय दबंग आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात महत्वाचे स्थान देऊन तमाम महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म व मराठा, धनगर आणि बहुजणांचा सन्मान करावा अशी मागणी आटपाडी तालुक्यातील समाज युवा नेते विनायक पाटील यांनी केली आहे.