1990 ची पुनरावृत्ती! आबा आणि भाऊंची जोडी एकत्र

राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा शपथविधी नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.यानंतर आता आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. शनिवारी आणि रविवारी 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल.  स्व. आर. आर. पाटील आबा व स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दोघांनी एकत्रितच विधान भवनामध्ये प्रवेश केला होता. आज पण त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधान भवनात प्रवेश केला. या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आबा आणि भाऊंची जोडी एकत्र आल्याची भावना अनेकांनी बोलून दाखव ली.