कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेस गळती

इचलकरंजी शहरात पाण्याचा प्रश्न खूपच प्रसिद्ध झालेला आहेच. पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे नागरिकातून नाराजीचा सूर देखील येत असतो. अशात्तच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या गळतीमुळे नागरिक खूपच त्रस्त आहेत. कृष्णा पाणी योजनेच्या जुन्या जलवाहिनीला कुरुंदवाड-शिरढोण फाट्यानजीक गळती लागल्याने मंगळवारी दुपारपासून इचलकरंजी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मजरेवाडी कडून येणाऱ्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार असून अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. काम पूर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल.. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.