बावची येथील संपर्क दौऱ्यानिमित्त बावची येथे बैठक झाली. या बैठकीत बावचीसारख्या मोठ्या गावाचे महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लवकरच लावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. बावची येथील संपर्क दौऱ्यानिमित्त झालेल्या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, सरपंच कविता अनसे आदींची उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले बावचीतील पाणंद रस्ते ग्रामीण रोजगार हमी योजनेतून, तर नागठाणे आणि वाळवा रस्ता हा आमदार निधीतून करण्याबाबत प्रस्ताव करू. जल जीवन योजनेचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकारी व ठेकेदारांची संयुक्त बैठक घेऊ. यावेळी ग्रामस्थांनी नागठाणे रस्ता, आवटी पाणंद रस्ता, आष्टा शिवरस्ता करावा, तसेच महादेव मंदिर व लक्ष्मी मंदिर येथील सभा मंडपाचे काम अशी मागणी केली.