सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असुन राज्य सरकारने सुध्दा सांगोला तालुक्यात दुष्काळ जाहिर केला आसुन बळीराजा दुष्काळाच्या झळा सोसत असताना सरकारी मदत मात्र मिळत नाही ,सरकारच्या उपाययोजना कुठे पहावयास मिळत नाहीत. अशा बिकट अवस्थेत शेतकरी सापडला असताना, सांगोला तालुक्यात अवकाळी पावसाने वाऱ्याने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. गुरांचे गोठे उखडून पडले आहेत.
जतन केलेल्य राज्य सरकारने जनावरांऱ्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. नागरीकांच्या घरांचे गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यांचे झालेले नुकसान, शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे ताबडतोब पंचनामे करुन सरकारी मदत देण्यात यावी व नागरीकांना काही प्रमाणात दिलासा देण्याची मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केली.