सोलापूरकरांचा वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून सोलापूर ते उजनी अशी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. सध्या ८८ किमी काम पूर्ण झाले असून आता राहिलेले काम पूर्ण व्हायला नोव्हेंबर उजाडेल, अशी स्थिती आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरकरांचा पाणीप्रश्न न सुटल्यास भाजपला या निवडणुकीतही फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.
दुसरीकडे विमानसेवेचे अडथळे दूर होऊन १५ जूनला एक वर्ष पूर्ण होत असतानाही विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही. आता विमानतळावरील कामे अंतिम टप्प्यात आहेत, पण केंद्रीय हवाई उडान मंत्रालयाच्या परवानगीशिवाय विमानसेवा सुरू होणे अशक्य मानले जात आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे.
दुसरीकडे सोलापूरचा पाणीप्रश्न सोडविताना समांतर जलवाहिनीचे काम विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करून सोलापूरकरांना नियमित तथा किमान एक-दोन दिवसाआड पाणी द्यावेच लागेल. केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता, सर्वाधिक आमदार असतानाही हे प्रश्न न सुटल्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.