हातकणंगले लोकसभा मतदार संघात धैर्यशील माने खासदार म्हणून निवडून आल्यास कबनूर दर्गा ते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर पर्यंत दंडवत घालेन असा नवस रुई येथील सामाजिक कार्यकर्ते व कट्टर माने प्रेमी अमित पाटील यांनी केला होता. तो नवस पूर्ण झाल्याने त्यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता कबनूर येथून दंडवत घालत ते कोल्हापूरला रवाना झाले.अमित पाटील हे सहारानगर रुई येथे राहतात.
ते धैर्यशील माने यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने निवडून आल्यास दंडवत घालण्याचा नवस केला होता. अखेर माने निवडून आल्याने त्यांनी लागलीच बुधवारी सकाळी दंडवत घालत कोल्हापूरकडे प्रस्थान केले. सकाळी कबनूर दर्यामध्ये दर्शन घेतले. त्यांचे रुकडी येथे हार घालून स्वागतही करण्यात आले. आपल्या नेत्याबद्दल अमित पाटील यांच्या मनात असलेल्या प्रेमाचे दर्शन यानिमित्ताने घडून झाले.