इचलकरंजीत नागरिकांना रस्ते खुदाईचा….

सध्या मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. पावसाची रिपरिप चालू झालेली आहे. अशातच इचलकरंजी शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इचलकरंजी शहरात महासत्ता चौक ते थोरात चौक पर्यंत कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या नवीन वितरण नलिका टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे. मात्र खुदाई करण्यात आलेल्या रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क न केल्याने मोठ्या प्रमाणात चरी पडल्या आहेत. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, हे काम करत असताना दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे

या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते तसेच छोटे मोठे अपघात ही घडत आहेत. चरी तातडीने पॅचवर्क करण्याचे आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. तेव्हा तातडीने चरींचे पॅचवर्क न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भागातील नागरिकांनी दिला आहे.