वस्त्रनगरी भव्य शोभायात्रेने झाली श्रीराममय…..


काल आयोध्येत श्री राम प्राणप्रतिष्ठापना झाली. प्रत्येक गावोगावी श्री रामाचा जयघोष सुरु होता. जय श्रीराम चा अखंड जयघोष, पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझीमच्या ठेक्यावर धरलेला ताल अन् हजारोंच्या संख्येने सहभागी रामभक्तांच्या साक्षीने इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्यावतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली. भगव्या साड्या, भगवा कुर्ता, झेंडे, टोप्या यामुळे संपूर्ण शहर भगवेमय होऊन गेले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

रामजन्मभूमी अयोध्या श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाच्या या शोभायेत्रेत श्रींची पालखी, राम-लक्ष्मण-सिता यांची वेशभूषा केलेल्या भक्तांचा रथ, पाण्यात तरंगणारा रामसेतुचा दगड, मंदिराच्या प्रतिकृतीमार्गावर – खाली होणाऱ्या हनुमानाच्या प्रतिमेचा तांत्रिक देखावा यांचा समावेश लक्ष वेधत होता. या शोभायात्रेत अध्यात्म, परंपरा आणि विज्ञान यांचा सुरेख संगम पहायला मिळाला. या अविस्मरणीय सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने शोभायात्रा व पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी श्री काळा मारुती मंदिर येथे प्रभू श्रीराम आणि रामभक्त हनुमान यांची आरती व पालखीचे पुजन आमदार प्रकाश आवाडे व सौ. किशोरी आवाडे यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, स्वप्निल आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, सौ. वैशाली आवाडे, सौ.शोभायात्रेत महिलांचे झांजपथक, लेझीम पथक याशिवाय संपूर्ण लवाजमासह धनगरी ढोल, बेंजो, बँडपथक आदी पारंपारिक वाद्यांचा गजर अखंडपणे सुरु होता. वारकरी सांप्रदाय आणि भजनी मंडळांच्या वतीने श्रीरामाच्या जीवनकथेचा प्रसार केला जात होता. तर रथामध्ये राम-लक्ष्मण- सिता आणि हनुमान यांची वेशभूषा साकारण्यात आली होती.