जयंत पाटील नोव्हेंबरनंतर अध्यक्षपद सोडणार…..

मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.काल (सोमवारी) अहमदनगर (Ahmednagar) येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना अप्रत्यक्ष चिमटा देखील काढला आहे. माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू नका, काही तक्रार असल्यास शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगा. असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवारांना अनेकजण सोडून गेले, चिन्हही चोरलं, पण तुतारी चिन्हावर 8 खासदार निवडून आणले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राज्यात 80 टक्के जागा मिळाल्या त्यामुळे आमचा महाराष्ट्रातील प्रयोग यशस्वी झाला, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

तर लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाबाबत प्रचार झाला आणि देशातील संविधान बदलता येऊ नये यासाठी भाजपच्या राज्यातील जागा कमी झाल्या असं जयंत पाटील म्हणाले आहेत. सोबतच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देईल असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादी किती जागा लढवणार? याबाबत बोलताना आम्ही मविआच्या बैठकीत हा निर्णय घेऊ, असं जयंत पाटील म्हणाले.