गुरुमाऊली नागरी सहकारी पतसंस्था म. सांगोला या पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिपावली भेट वस्तूचे वाटपाचा शुभारंभ झाला. चालू आर्थिक वर्षात संस्थेला १,७६,६९३५०/- एवढा नफा झाला असून संस्थेने सभासदांना लाभाश वाटप १२% व दिपावली ( भेट वस्तूंचे वाटप ७ किलो साखर, २ किलो तेल, कापडी पिशवी १, २ किलो ह दाळ, २ किलो गरा व १ मोती साबण प्रत्येक सभासदांना देण्याचे विजयादशमीच्या मुर्हतावर सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांचे हस्ते उद्घाटन झाले.
दिपावली भेट वस्तूचे वाटप दि.२५/१०/२०२३ ते १०/११/ २०२३ पर्यंत सकाळी १० ते ५ या कार्यालयीन वेळेत वाटप करण्यात येईल तरी सर्व सभासदांनी आपला दिपावली भेटवस्तू घेवून जावे. यावेळी संस्थेचे चेअरमन मारुती (आबा) बनकर, व्हा. चेअरमन शिवशंकर शेटे, सी.ए. उत्तम बनकर, अँड.टी.डी. ढेरे, शिवाजी बनकर, विजय राऊत, सुरेश माळी, रामचंद्र बनकर, संचालक प्रा. भिमराव फुले, देविदास बाबर, सूर्यकांत दोडे, श्रीकांत बनकर, महादेव ननवरे, दिपक खडतरे, काका आहेरकर, अमर जाधव, सावता राऊत, शिवाजी आदलिंगे, संदिप लिंगे, हणमंत यादव, संस्थेचे व्यवस्थापक दत्तात्रय राऊत व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.