फॅबटेक कॉलेजच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी शै. वर्ष २०२३ २४ मध्ये प्रवेश घेतलेल्या डी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचे स्वागत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. हा कार्यक्रम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने तसेच द्वितीय वर्षातील विद्याथ्र्यांनी आयोजित केला होता. सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कॅम्पस मध्ये असणान्या सर्व सोयी सुविधांची माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांनी उपस्थित विद्याथ्यांना दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी. फार्मसी चे दुरुगामी होणारे फायदे सांगून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच ‘डी फार्मसी प्रथम वर्षाच्या वर्गशिक्षिका प्रा. जी. डी डोंगरे आणि द्वितीय वर्षाचे वर्गशिक्षक प्रा. एस. जे. मणेरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. यावेळी प्राचार्य डॉ. संजय बैस तसेच डी. फार्मसी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस. यु. कांबळे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख व स्टाफ यांची ओळख करून देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग प्रयोगशाळा लायब्ररी ऑफिस इत्यादी विभागांची माहिती करून दिल्ली पूर्ण वर्षाचे शेड्युल यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी फनी गेम्स नृत्य व संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात आला.

सर्व विद्याथ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमास मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर यांची निवड करण्यात आली मिस फ्रेशर म्हणून कु. ईशा कभीराज व मिस्टर फ्रेशर म्हणून कु. निलेश सुतार आणि संगीत खुर्ची मधून कु. सत्यजित कोळी यांची निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ. एस. के. बैस आणि बी. फार्मसी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस. एम. काझी आणि प्रा. एस आर माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व विद्याथ्यांना अल्पोहार देण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. एस. . कांबळे, प्रा. जी. डी. डोंगरे, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर व परिसर संचालक डॉ. संजय आदाटे, आणि प्राचार्य डॉ. एस. के. बैस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.