तासगावात दोन ज्युनिअर पाटील भिडणार

तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील (आबा) आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा संघर्ष संपूर्ण राज्याने पहिला आहे. मात्र आता तोच संघर्षाचा वारसा पुढच्या पिढीकडे अर्थात दोन ज्युनियर पाटलांमध्ये देखील पहायला मिळत आहे.आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित आणि संजयकाकांचे पुत्र प्रभाकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही युवा नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असल्याचे चित्र दिसत आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. प्रथम लोकसभेच्या निवडणुका होतील. तत्पूर्वी तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीसाठी टशन सुरू झाले आहे.