सांगोला तालुका शेतातून म्हैस नेल्याच्या कारणाने महुद येथे एका महिलेस मारहाण केल्याचा घटना घडली असून याबाबत अधिक माहिती अशी की रविवार दि.०९ मार्च रोजी दु. ४ वा. च्या सुमारास फिर्यादी तब्बसुम हुजेफ मुलाणी रा. सांगली सध्या राहणार चिकमहुद येथे राहत्या घरात असताना त्यांचा भाऊ अलताफ मुलाणी हा घराच्या बाजुला असणा-या शेतात होता. त्यावेळी शमीर मुलाणी व शबीया मुलाणी हे दोघे आमच्या भावाच्या शेतातील मक्याच्या पिकामधुन म्हैस घेवुन चालले होते. त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ अलताफ हा त्यांना म्हणाला की, शेताच्या मधुन जावु नका पिकाचे नुकसान होते.
त्यावेळी शमीर यांनी माझा भाऊ अलताफ याला शिवीगाळी करुन लाथाबुक्यांनी मारहाण करु लागल्याने त्याच्या भांडणाचा आवाज ऐकुन उस्मान मुलाणी व आस्मा मुलाणी हे दोघे धावत फिर्यादी यांच्या भावा जवळ येवुन उस्मान मुलाणी यांनी त्याच्या हातातील लाकडी काठीने माझ्या भावाच्या पाठीत मारहाण करु लागले त्यावेळी फिर्यादी या त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये गेले असता शमीर मुलाणी याने हातात दगड घेवुन तु कोण तुला काय करायचे आहे. तु मध्ये का आलीस असे म्हणुन त्याच्या हातातील दगड फिर्यादी यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर मारुन दुखापत करून तुम्हाला बघुन घेतो तुम्हाला सोडत नाही असे म्हणुन निघुन गेले.
दरम्यान फिर्यादी यांना दुखापत झाल्याने रक्त येवु लागल्याने खाजगी वाहनाने सांगोला पोलीस ठाणेस आल्या नंतर त्यांनी आम्हाला दवाखाना यादी दिल्या नंतर आम्ही उपचार घेवुन सांगोला पोलीस ठाणेस तक्रार देणेसाठी आले असून फिर्यादी तब्बसुम हुजेफ मुलाणी यांची शमीर अब्दुल मुलाणी व उस्मान अब्दुल मुलाणी दोघे रा. चिकमहुद ता. सांगोला यांच्या विरुद्ध तक्रार असल्याचे फिर्यादीत नोंद असल्याची माहिती पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.