पावसाळ्याच्या तोंडावरच भाजीपाल्यांचे दर कडाडले…….

भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. भाजीपाला उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचाच परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर होत आहे.ऊन्हामुळे भाजीपाला पिवळा पडत होता आणि पाणी नसल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत होती.

त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा आवक कमी झाली आहे. कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.कोथिंबीर, हिरवी मिरली, कारलं, शेवगा यांसारख्या भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. राज्यात टॉमेटो ४५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.

तर शिमला मिर्ची एक किलो ७२ रुपये, कारलं एक किलो ८० रुपयांनी विकले जात आहे. शेवग्याची किंमत दुप्पट झाली असू एक किलो शेवगा ६० रुपयांना विकला जात आहे. अदरक २१० रुपये प्रति किलो विकले जात आहे. कोथिंबीरीची जुडी जवळपास ३०-४० रुपयांना विकली जात आहे.

कांद्याची किंमत वाढली असून एक किलो कांदा ५० रुपयांना विकला जात आहे. बटाट्यांची किंमत ३४ रुपये तर भेंडी १ किलो ७० रुपये झाली आहे. सर्वच भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाज्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणाटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे शेतजमिनींना योग्य पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. येत्या काळात भाजीपाल्यांचे दरात घट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.