‘बिग बॉस’ 18 (Bigg Boss 18) ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच सलमान खानने ‘बिग बॉस’ 18 चा प्रोमो शूट केला असल्याचं समोर आलं आहे. प्रोमो अवघ्या काही दिवसात रिलीज होणार आहे.
‘बिग बॉस’ 18 कधीपासून सुरु होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण, यात कोण स्पर्धक सहभागी होणार, याबद्दल काही नावांची चर्चा सुरू आहे. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे.
यामध्ये एका लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रादेखील (Raj Kundra)सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. असे झाले तर यावेळचा बिग बॉस नक्कीच खूप धमाकेदार होणार आहे. राज कुंद्रा एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. पण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
संभाव्य स्पर्धकांमध्ये राज कुंद्रा, सुधांशू पांडे, अनिता हसनंदानी, जान खान, धीरज धुपर, मीरा देवस्थळे, सुरभी ज्योती, अलिशा पनवार, शाहीर शेख, फैसल शेख, समीरा रेड्डी, अंजली आनंद, चाहत पांडे, रीम शेख, सुनील कुमार, यांच्यासह यूट्यूबर मॅक्सटर्न आणि ठगेश यांच्याही नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
