तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी सरकार 3.0 ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात, 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025 साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
आता मोदी सरकार लवकरच पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 1 जुलै 2024 रोजी निर्मला सीतारामन पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. 24 जून ते 3 जुलै दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशनमोदी सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठी भेट दिल्यानंतर आता लवकरच देशातील जनतेसाठी आपली पेटी उघडणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या 24 जून ते 3 जुलै दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. यात मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 1 जुलै रोजी सादर होण्याची शक्यता आहे. 26 जून रोजी 18 व्या लोकसभेसाठी लोकसभा अध्यक्षांची निवडदेखील होईल.