अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये म्हणजे आजच्या दिवशी वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या मृत्यूला आता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तरी देखील अभिनेत्याला कोणी विसरू शकलं नाही.सुशांत याने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
शिवाय अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे.अंकिता लोखंडे हिने सुशांत याचा त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री सलेन्ट सॉग्न फोटोला दिलं असून अंकिता हिने कॅप्शन लिहिलं नाही.अंकिता आणि सुशांत यांनी एकमेकांना तब्बल सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या.
पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.’पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे दोघांमध्ये प्रेम बहरलं. मालिकेत दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. आजही सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट असतात. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.