सर्वात मोठी बातमी,राजकीय वर्तुळात खळबळ…..

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला.  

दोन्ही गटाची सविस्तरपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर येत्या १० जानेवारीला यासंदर्भातील निकाल देण्यात येणार आहे. मात्र, या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं. किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील, अशी रणनीती भाजपने आखल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. कोर्ट यावर काय निर्णय घेईल, याकडे देखील भाजपचे लक्ष असेल.सुप्रीम कोर्टाने जर शिंदे यांना अपात्र ठरवले तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. तशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीसोबत तातडीने विधानसभेच्या निवडणुका घेण्याची भाजपची इच्छा नाही.

त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाला उशीर झाला, तर तो शिंदे गटाच्या पथ्यावर पडेल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. दरम्यान, मार्चच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अपात्रतेबाबत निकाल दिला तर शिंदे आणि भाजपची अडचण होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता भाजपने रणनीती आखल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.