‘या’ अभिनेत्रीचे विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक!

बॉलिवूड आणि टॉलीवूडमध्ये तिच्या अभिनयाने तिने नाव कमावलं आहे. चित्रपटापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे ती कायम चर्चेत असते. आता ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न आहे, अशी चर्चा रंगली आहे. 

साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. धनुष, थलपती, राणाशी नवा जोडलं गेलेली ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न करत आहे, अशी चर्चा रंगली आहे. 
तमिळ तेलुगू चित्रपटांतून नाव कमावलेल्यानंतर तिने बॉलिवडूमध्येही अनेक चित्रपट केले. ही अभिनेत्री आहे, त्रिशा कृष्णन. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. यावेळी ती एका निर्मात्याच्या प्रेमात असून ती त्याच्याशी लग्न करणार असल्याचं बोलं जातं आहे.   सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी तिने याबद्दल अधिकृत काही सांगितलं नाही आहे. 
मल्याळम निर्मात्यासोबत लग्न करणार अशी चर्चा असली तरी त्याचं नाव आणि लग्नाची तारीख काही समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार त्रिशाचं पहिलं अफेअर विजयसोबत होतं असं म्हणतात. ते दोघे 2005 मधील घिल्ली चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. मात्र त्यांनी या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही. मग बाहुबली फेम राणा दग्गुबतीसोबत त्रिशाचं अफेयर होती. खरं तर हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते असा खुलासा खुद्द राणाने कॉफी विथ करणमध्ये केला होता. या दोघांचे इंटिमेट फोटोदेखील सोशल मीडियावर लीक झाले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण त्यानंतर 2015 मध्ये त्रिशाने बिझनेसमन वरुन मनियान यांच्याशी साखरपुडा केला. मात्र काही महिन्यांमध्येत हा साखरपुडा मोडला. 
धनुषमुळे हा साखरपुडा तुटला असं बोलं जातं. कारण वरुण आणि धनुषचे संबंध बरे नव्हते त्यामुळे साखरपुड्यात या दोघांमध्ये वाद झाला होता, असं मीडिया रिपोर्टनुसार म्हटलं जातं. शिवाय धनुषसोबतची तिची वाढती जवळीक चर्चेचा विषय बनली होती.  त्यानंतर 2020 मध्ये तिचं नाव सिलांबरसन टीआरशी जोडलं गेलं. त्यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्रिशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती थलपथी विजय आणि दिग्दर्शक लोकेश कंग्रज यांच्याबरोबर ‘लिओ’ या चित्रपटात झळकणार आहे.