ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्यामुळे काल रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेची कोणतीही गरज नसल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.रजनीकांत यांचे वय ७३ असून, त्यांना मंगळवारी एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तामिळनाडूतील चेन्नई पोलीस विभागानेही या घटनेची पुष्टी केली असून, त्यांनी सांगितले की, पोटात तीव्र वेदनांमुळे रजनीकांत यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.