सुहासभैय्या बाबर एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवणार शिवसैनिकांचा विश्वास…

खानापूर आटपाडी विटा हा सांगली जिल्ह्यातील परिसर अवर्षणग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो. सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे आणि कालव्यांची निर्मिती झालेली नसल्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करीत असतात. आपल्या संपूर्ण राजकीय हयातीत अनिल बाबर यांनी हा परिसर पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. कृष्णा नदीचे पाणी आपल्या तालुक्यात खेळावे असाच त्यांचा प्रयत्न होता.

1972 पासून राजकीय क्षेत्रात अनुभवी असलेले अनिल बाबर यांना मोठ्या यशाने नेहमीच हुलकावणी दिली.2014 च्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकली नाही. 2019 साली उद्धव ठाकरे त्यांना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी करून घेतील, असा अंदाज होता. मात्र उद्धव ठाकरे यांनीही अनिल बाबर यांच्या मंत्रिपदाकडे दुर्लक्ष केले. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात अनिल बाबर यांनी शिंदेंना साथ दिली आणि बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत बनले. दुर्दैवाने अलीकडेच अनिल बाबर यांचे निधन झाले.

त्यानंतर काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे या यांनी खानापूर आटपाडीचा दौरा केला होता त्यावेळी त्यांनी बाबर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. बाबर यांच्या दोन्ही मुलांना आई-वडिलांची उणीव भासू देणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या शब्दाला जागत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे यांनी अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना यांना संधी दिली आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. की त्याच्या कामाचा वारसा सर्वच राजकीय पक्षात असलेले सलोख्याचे संबंध आणि युवा नेतृत्व यामुळे सुहास बाबर हे एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवतील असा विश्वास शिवसैनिकांना वाटत आहे.