कोल्हापूर येथे रेल्वेखाली चिरडलेल्या आई अन् मुली इचलकरंजीच्या…

रेल्वेखाली चिरडलेल्या त्या महिलांची ओळख पटली असून आई अन् तिच्या दोन मुली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सकिना चंदन मुजावर (वय ४०), फिरदोस चंदन मुजावर (२२) आणि अलिशा चंदन मुजावर (१०, रा.सर्वजण जिव्हेश्वर मंदिराजवळ, भोने माळ, इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. या तिघींनी जीवन संपवले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.मुजावर कुटुंबीय इचलकरंजीत राहते. चंदन मुजावर यांचे स्पेअर पार्ट्सचे दुकान आहे. सकिना मुजावर या शुक्रवारी (१४) जून रोजी दुपारी ४ वाजता बाजारात जाऊन येतो असे सांगून बाहेर पडल्या आणि परत आल्याच नाहीत.

त्यामुळे चंदन मुजावर व त्यांचे भाऊ मन्सूर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मन्सूर मुजावर यांच्या दीपक केसरकर या मित्राने त्याबाबत त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीस आणि नंतर शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला.पोलिसांनी त्यांना सीपीआरमधील शवविच्छेदन विभागात आणले. परंतु मन्सूर मुजावर यांना ओळख पटली नाही. अखेर चारच्या सुमारास चंदन मुजावर आले. त्यांनी लहान मुलीला ओळखले.