इचलकरंजीत हायमॅक्स पथदिव्यांचे काम सुरु

वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी शहर काही ना काही कारणाने कायम चर्चेत असतेच. सध्या इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न खूपच जोर धरत आहे.अशातच आता शहरातील मुख्य चौक रस्त्यांवर हायमॅक्स दिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे. स्टेशन रोडवरील स्वागत कमानीजवळ २, स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी चौक आणि पॉवर हाऊस या ठिकाणी सध्या पिलर उभारणीचे काम सुरु आहे. लवकरच हा रस्ता लख्ख प्रकाशाने चकाकणार आहे.