प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक (Alka Yagnik )यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आजाराने अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही. अलका याग्निक यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे.
अलका याग्निक यांनी म्हटले की, एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईनासं झालं असं त्यांनी म्हटले. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे, सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केले आहे.
कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असं त्यांनी म्हटले. त्यामुळे मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असे आवाहनही त्यांना केले आहे.अलका याग्निक यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्या आहेत. गायक सोनू निगम, गायिका-अभिनेत्री इला अरूण यांनीदेखील अलका यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.