मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

शिवसेना उपनेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबई महानगर महापालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.दरम्यान, यामुळे मुंबईसह राज्यात खळबळ उडाली आहे.

अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज आपला वाढदिवस (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काल रात्री ठाण्यातील निवासस्थान असलेल्या शुभदीपवर करण्यात आलेली रोषणाई देखील बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेली रोषणाई देखील बंद करायला सांगितली. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार होती, ती सुद्धा न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थान शुभदीप या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांना मोबाईल फोटो न काढण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.