पाडळी तालुका हातकणंगले येथे 2007 पासून सुरू असलेल्या जलस्वराज्य योजनेतील घोटाळा संदर्भात आज विधानसभेत आवाज उठवला. कागदोपत्री योजना दाखवून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार राजू बाबा आवळे यांनी केली आहे.
विधानसभेत आमदार राजू बाबा आवळे म्हणाले,हातकणंगले मतदार संघामध्ये पाडळी हे एक गाव आहे. या गावात पाच हजार लोकसंख्या आहे. गावामध्ये 2007 ला जलस्वराज्य योजना मंजूर झालेली होती. परंतु ही योजना फक्त कागदावरच आहे गावाला तर पाणी तर मिळालंच नाही यामध्ये राहुल वसंत पाटील यांनी माहितीच्या अधिकाऱ्याकडे माहिती मागवली.
परंतु कोणत्याही डिपारमेंटमध्ये ही योजना कुठेही वर्ग झालेली नाही. त्याचप्रमाणे त्यानंतर 2021 – 22 ला जल जीवन मिशन मंजूर झालं. ते पण कागदावरच आहे. फक्त खोटे नाटक कागदपत्र गोळा करून या योजना मंजूर केलेल्या आहेत. परंतु गावाला पाणी मिळालेले नाही.
त्यामुळे यापाठीमागे कोणते अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे आणि गावाला जर पाणी मिळालेले नाही आणि मग एक कोटी उचल दिली आहे मग एक कोटी रुपये गेले कुठे हे डिपार्टमेंट सांगतही नाही. त्यामुळे जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी आमदार राजू बाबा आवळे यांनी केली आहे.