NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहरामुळे देशभरातील विद्यार्थी आक्रमक झाले होते. नीट परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी देशभरातील विद्यार्थ्यांकडून केली जात होती.अखेर विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले असून सरकारने नीट परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने याबाबत पत्रक काढून याआधी झालेली नीट परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले आहे. तसेच नव्याने परीक्षा जाहीर केली जाणार असल्याचे म्हटले आहे.दरवर्षी नीट परीक्षेला देशभारातून 24 ते 25 लाख विद्यार्थी बसतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करत असतात. मुलाला डॉक्टर करण्यासाठी पालक आपली जमा असलेली तुटपुंजी खर्च करतात.
परंतू केंद्र सरकारकडून विशिष्ट संस्थेतील विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येत असेल तर या परिक्षा घ्यायच्या कशाला असा सवाल पालक विचारत आहेत. ग्रेसच्या नावाखाली पैकीच्या पैकी मार्ग देऊन देशातील 67 विद्यार्थी 720 पैकी 720 गुणांनी उत्तीर्ण झाले. आजपर्यंत नीट परीक्षेच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडला.
त्यामुळे नीट परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने घ्यावी, केंद्र सरकारने या बाबतीत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींविरुद्ध कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.