48 व्या वर्षी पंकज त्रिपाठींनी फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

बॉलिवूड सुपरस्टार पंकज त्रिपाठी हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. त्यांचा ‘स्त्री 2’ चित्रपटातील अभिनय आणि चित्रपटाला मिळालेले यश यामुळे ते प्रचंड चर्चेत होते. मात्र, पंकज त्रिपाठी हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य हे सोशल मीडियापासून दूर ठेवतात. अशातच आता पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे नेमकं फोटोमध्ये पाहूयात सविस्तर

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते त्यांची पत्नी आणि एका चिमुकल्या बाळासोबत दिसत आहेत. यामुळे सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नीच्या आयुष्यात एका चिमुकल्याचं आगमन झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मृदुला आई-बाबा नाही तर काका-काकी बनले आहेत.

सध्या पंकज त्रिपाठी यांचा चिमुकल्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण त्यांच्या मांडीवर असलेले बाळ हे अभिनेता परितोष त्रिपाठी यांचं आहे. या फोटोत त्यांच्यासोबत पत्नी मृदुला देखील दिसत आहे. त्या चिमुकल्याला हातात घेत पंकज त्रिपाठी हा फोटो शेअर केला आहे. यावेळी दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

या फोटोत पंकज त्रिपाठी हे रंगीबेरंगी शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहेत. तर पत्नी मृदुला ही गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. परितोष त्रिपाठी यांनी या फोटोला ‘बहुत सारा प्यार’ असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी देखील या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

परितोष आणि त्यांची पत्नी मीनाक्षी चंदनं यांनी 23 मे रोजी आपल्या मुलीचं स्वागत केलं आहे. परितोष त्रिपाठी हे अभिनेते आणि लेखक देखील आहेत. त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये लूडो, जनहित में जारी आणि केस तो बनता है अशा चित्रपटांचा समावेश आहे.