वाहनांच्या किंमतीत होणार वाढ, नवीन दर ‘या’ तारखेपासून लागू?

 देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी  टाटा मोटार्सच्या बाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टाटा मोटार्सने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ (Vehicles Price) करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटार्सने वाहनांच्या किंमतीत  2 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळं कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती मिळाली आहे.

टाटा मोटार्सने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. टाटा मोटर्सची वाहनांच्या किंमतीत जवळपास 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर हे 1 जुलैपासून लागू होणार आहेत. टाटा मोटर्सने बुधवारी याबाबतची माहिती दिली. वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं आपल्या वाहनांचे दर वाढवावे लागले आहेत. दरम्यान, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही वाढ सर्व प्रकारांवर वेगळी असणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सध्या नवीन उत्पादने लॉन्च करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारत, ब्रिटन, अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामधील जनरल नेक्स्ट ग्राहकांच्या गरजेनुसार ही वाहने तयार केली जात आहेत. ही सर्व वाहने आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. महसुलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने मार्चमध्ये आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आर्थिक वर्ष 2024 मध्ये टाटा मोटर्सचा महसूल 52.44 बिलियन डॉलर झाला आहे.