सांगली जिल्ह्यासह राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार विभागातील योजनांची चौकशी करा, अशी मागणी तालुका काँग्रेस चे गजानन सुतार यांनी केली आहे. याबाबत राज्याच्या कामगार विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांना दिलेल्या पत्रात सुतार यांनी म्हटले आहे, की शासनाच्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत कामगाराला विविध योजनांचा लाभ दिला जातो . त्यामुळे बांधकाम कामगाराला विविध फायदे मिळण्यास मदत होते. मात्र सांगली जिल्यासह राज्यभरात काही अधिकारीच एजंटांना हाताशी धरून बांधकाम कामगाराऐवजी बोगस लाभार्त्यांची नोंदणी करीत आहेत . सांगली जिल्ह्यात अशा पद्धतीचे अनेक बोगस लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. राज्यभरातदेखील अशाच पद्धतीने बांधकाम कामगाराऐवजी बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत. या प्रकरणातून राज्यभरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींची गांभीर्यपूर्ण दाखल घेऊन राज्यभरातील इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेतील बोगस लाभार्त्यांची नोंदणी व त्यांना गैरमार्गाने दिले जाणारी शासकीय मदत याची चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर काडत कारवाई करावी . अन्यथा काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर आंदोलन करू असेही सुतार यांनी म्हटले आहे.
बांधकाम कामगार विभागाच्या योजनांची चौकशी करावी
