जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नियमबाह्य कर्जवाटप, विविध खरेदीत गैरव्यवहार, नोकरभरती, शासकीय निधी वाटपात सात शाखांत अपहार झाला. बॅंकेची कलम ८८ नुसार चौकशी सुरु आहे. ती तत्काळ पुर्ण करावी. बॅंकेच्या विविध चौकशी सहकार खात्याकडून व्हावी. विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा.
विद्यमान तसेच मागील संचालक मंडळावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून त्यांची वसुली करावी. बॅंक वाचविण्यासाठी मंगळवारी 25 तारखेला जिल्हा बॅंकेवर चाबूक मोर्चा काढण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.