इचलकरंजीचा पाणीप्रश्न तर खूपच बिकट आहे त्यातच आता पाण्याचे वेळापत्रक कोलमंडलेले आहेच. इचलकरंजी येथील कलानगर जमदाडे मळा बुगड खानावळ परिसरामध्ये गेल्या दहा दिवसापासून नळांना पाणी आले नव्हते दहा दिवसाच्या खंडानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नळांना पाणी आले परंतू सदर चे पाणी हे काळे कुट्ट दिसत होते तर पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले .
यापूर्वीही अनेकदा या परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त घाण पाणी आले होते मध्यंतरीच्या काळामध्ये घाण पाणी येणे बंद झाले होते परंतु पुन्हा गुरुवारी सायंकाळी नळांना दुर्गंधी युक्त घाण पाणी आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे यापूर्वीही बंडगर माळ स्वामी गल्ली आईजीएम परिसरमध्ये ही पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे गटारीतील घाण पाणी येण्याचा प्रकार घडला होता याबाबत काही सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी महानगरपालिकेसमोर आंदोलने केली होती.
परंतु अद्याप या भागातील जीर्ण झालेली जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनला आहे सदरच्या घाण पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता बळावली असून महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे