इचलकरंजी शहराला शुध्द आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत झालीच पाहिजे यासाठी कृती समितीच्यावतीने शुक्रवार ता. २१ रोजी महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुळकूड पाणी योजनेला आमदार प्रकाश आवाडे हे अंतर्गत विरोध करीत असल्याचा आरोप करण्यात आला.यावेळी मदन कारंडे यांनी, शहरातील तीव्र पाणीटंचाईची माहिती असूनही ते मुबलक आहे असे म्हणणे म्हणजे शासनाने मंजुर केलेली पाणी योजना नको आहे असा अर्थ होतो.
एकिकडे शासनाने ही योजना पूर्णत्वास आणावी यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत. पण आमदार आवाडे हे मुद्दाम कागल तालुक्यातील लोकांच्या मागणीला पाठबळ देण्याचे काम करत आहेत, अशी टीका करत शहरामध्ये शुद्ध पेयजल प्रकल्प निकृष्ट दर्जाचे कुछ पाणी योजने कार्यवाही हरित झाली पर सुळकूड योजनेसाठी महात्मा गांधी पुतळा चौकात कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.
शशांक बावचकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करून केवळ पैसे खाण्याचा उद्योग करण्यासाठी पेयजल प्रकल्प बसवण्यात आले. ६८ ठिकाणी प्रकल्प असले तरी त्यातून पाणी नेणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. याचा अर्थ नागरिकांना या पाण्यावर विश्वास नसल्याचे दिसत असून केवळ खिसे भरण्यासाठी हा उद्योग केल्याचा आरोप केला. तर येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांचा योजनेबाबत अहवाल येणार आहे, त्यानंतरच आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल, असा इशाराही प्रताप होगाडे यांनी दिला.