इचलकरंजी उद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी कार्यरत

इचलकरंजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून इचलकरंजीतील उद्योजक, कारखानदार, वस्त्रोद्योग, इंजिनियरिंग उद्योजक, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक यांच्यासाठी त्यांचे उद्योगातील व व्यवसायातील अडीअडचणी एकत्रितपणे व संघटितपणे सोडविण्याचे खुले व्यासपीठ आहे.फोरमच्या माध्यमातून इचलकरंजीतील युवक व नवउद्योजकांना भविष्यातील आर्टिफिशीयल, इंटिलिजन्स डेटा,इचलकरंजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरमचा उपक्रम सायन्स, ब्लॉकचेन, ग्रीन एनर्जी, आयात-निर्यात या नवीन उद्योगांबाबत अवगत करून या नवउद्योगांची कास पकडण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे.

याच अनुषंगाने फोरमतर्फे गेले काही दिवस इचलकरंजीतील प्रमुख उद्योग तसेच छोटे व्यापारी यांच्यासमोर असणाऱ्या आव्हानांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. यासाठी फोरमने विविध औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा अभ्यासगट गठीत करून उद्योगांच्या समस्या एकत्रित संकलन करण्याचे काम चालू केले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये फोरम व इचलकरंजीतील इतर प्रमुख औद्यागिक संघटनेच्या बरोबर संयुक्तपणे व्यापक अभ्यास करून त्यावर शाश्वत उपाय योजना आखण्यात येणार आहेत.

या उपक्रमात शहरातील प्रमुख औद्योगिक संघटना आणि संस्था सहभागी झालेल्या आहेत. तसेच प्रमुख सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभत असून या अभ्यासगटाला मार्गदर्शन करण्यासाठी सर्व प्रमुख औद्योगिक संघटनेतील अभ्यासू पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शक व सल्लागार मंडळ काम करीत आहे. तरी या उपक्रमासाठी इचलकरंजीतील जास्तीत जास्त उद्योजकांनी अडी-अडचणींची माहिती फॉर्ममध्ये भरून देवून सहकार्य करावे, असे आवाहन फोरमतर्फे राहूल सातपुते यांनी केले आहे.