टीम इंडियाचे 15 खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. भारतीय टीमने मुंबईवरुन कोलंबोला प्रयाण केलं. टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये 27 जुलै पासून सीरीज सुरु होणार आहे. दौऱ्याची सुरुवात T20 सीरीजने होणार आहे. यात टीम इंडियाचे 7 खेळाडू श्रीलंकन भूमीवर डेब्यु करतील. तुम्ही विचार करत असाल, श्रीलंका सीरीजसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंमध्ये ते 7 प्लेयर कोण असतील? जे श्रीलंका दौऱ्यावर पहिल्यांदा जाणार आहेत.
या 7 प्लेयर्समध्ये 3 गोलंदाज, 2 ऑलराऊंडर आणि 2 फलंदाज आहेत. श्रीलंका दौऱ्यावर डेब्यु करणाऱ्या त्या सर्व खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. सर्वात पहिलं आणि हैराण करणारं नाव म्हणजे खलील अहम. टीम इंडियाकडून डेब्यु करुन त्याला 6 वर्ष झाली आहेत. 2018 मध्ये तो पहिला T20 सामना खेळलेला. श्रीलंकेत कुठलाही T20 सामना खेळण्याची त्याची ही पहिली वेळ असेल.
यशस्वी जैस्वाल सुद्धा श्रीलंकेत पहिल्यांदा T20 मॅच खेळताना दिसेल. 2019 मध्ये T20 इंटरनॅशनलमध्ये जैस्वालने डेब्यु केला. पण श्रीलंकेत खेळण्याची त्याची पहिली वेळ असेल. 2023 मध्ये T20 मध्ये डेब्यु केल्यापासून रिंकू सिंह भारतासाठी आतापर्यंत 20 सामने खेळलाय. पण श्रीलंकन भूमीवर तो एकही सामना खेळलेला नाही.
श्रीलंकेत पहिल्यांदा रिंकू सिंह T20 मध्ये चौकार, षटकारांची बरसात करताना दिसेल. शुभमन गिलच्या कॅप्टनशिपमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर T20 मध्ये डेब्यु करणारा रियान पराग श्रीलंकेत पहिल्यांदा खेळणार आहे.
शिवम दुबे T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा भाग होता. पण तो श्रीलंकेत पहिल्यांदा खेळणार आहे. वनडे, T20 मध्ये अर्शदीप सिंहने टीम इंडियात आपली जागा पक्की केली आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये तो यशस्वी गोलंदाज होता. अर्शदीपची श्रीलंकेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रवी बिश्नोईला टीम इंडियाकडून T20 इंटरनॅशनल क्रिकेट खेळून 5 वर्ष झाली आहेत. श्रीलंकेत कुठला T20 सामना खेळताना तो पहिल्यांदा दिसेल.