वुमन्स टी20 वर्ल्डकपचा थरार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बांगलादेशमधील तणावपूर्ण स्थिती पाहता हा सामना यूएईत करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धचा पहिला सामना 3 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण दहा संघांनी भाग घेतला आहे. तसेच पाच पाच संघांची दोन गटात विभागणी केली आहे.
ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ अ गटात आहेत.तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड हे संघ ब गटात आहेत. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. 9 ऑक्टोबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होईल. 13 ऑक्टोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होईल. पहिला उपांत्य फेरीचा सामना 17 ऑक्टोबरला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 18 ऑक्टोबरला होईल. 20 ऑक्टोबरला अंतिम सामना होईल