खानापूर-आटपाडी मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक होणार तिरंगी अथवा चौरंगी

सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडी पाहता आटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरणामध्ये
प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे. खानापूरमधून दोन व आटपाडी तालुक्यातून दोन प्रभळ उमेदवार उभे राहिल्यास नवल वाटायला नको. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक तिरंगी अथवा चौरंगी होण्याची शक्यता आहे.

आटपाडी आटपाडी तालुक्याच्या राजकारणामध्ये काही दिवसातच मोठे द्विस्ट पाहायला मिळणार आहे. एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या दृष्टीने चाचपणी सुरू असून कार्यकर्त्यांनी २०१४ ला आमदार म्हणून सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल केल्या आहेत. सध्या आटपाडी तालुक्यामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षाचे वर्चस्व आहे.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रबळ दावेदार आहेत. भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, शिंदेसेनेचे युवा नेते तानाजी पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांचे तालुक्यातील प्रत्येक गावात समर्थक आहेत. मात्र, विरोधी महाविकास आघाडीकडे प्रबळ उमेदवार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीतील नेते पुन्हा महाविकास आघाडीत जाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.