जून महिना संपत आला असून पुढील आठवड्यापासून जुलै महिना सुरू होणार आहे. आयटीआर (इन्कम टॅक्स रिटर्न) आणि केंद्रीय अर्थसंकल्पामुळे हा महिना महत्त्वाचा आहे. पण, 1 जुलैपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत.एलपीजी सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केली जाते. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्येही बदल करण्यात येतो. 1 जुलै 2024 पासून कोणते आर्थिक नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड
बिलरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड बिल भरण्याबाबत नवीन नियम जारी केला आहे. हा नियम 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड बिल भरण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहे.या बदलाचा थेट परिणाम PhonePe, Cred, BillDesk आणि Infibeam Avenues सारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मवर होईल. RBI ने सर्व बँकांना आदेश दिले आहेत की 1 जुलै 2024 पासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जावे.
सिम कार्डचा नवीन नियम
दूरसंचार नियामक TRAI ने सिम स्वॅप फसवणूक रोखण्यासाठी 1 जुलै 2024 पासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सिमकार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास लॉकिंग कालावधी सात दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यापूर्वी अशा परिस्थितीत नवीन सिम लगेच उपलब्ध होत असे.
पीएनबी बँक खाते
जर तुमच्याकडे पीएनबी खाते असेल आणि तुम्ही ते अनेक वर्षांपासून वापरले नसेल, तर ते 1 जुलै 2024 पासून बंद केले जाऊ शकते. गेल्या 3 वर्षांपासून ज्या पीएनबी खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक शून्य आहे, अशी बँक खाती बंद केली जाणार आहेत.