नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे, खरोखरच ही एकप्रकारी मोठी संधी आहे.
ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसकडून राबवली जातंय. अनेकांचे स्वप्न असते भारतीय डाक विभागात नोकरी करण्याचे आणि ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकते. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सर्व सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही 15 जुलै 2024 पासून सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळेल. यानंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. indiapostgdsonline.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. अर्ज करण्यासाठी लिंक अजून सुरू झाली नाहीये, 15 जुलैनंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
दहावी पास उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवाराला संगणकाचे ज्ञानही असणे आवश्यक आहे. हेच नाहीतर उमेदवाराला सायकलही चालवता आली पाहिजे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये.
18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल. 100 रुपये फीस भरतीसाठी उमदेवारांना भरावी लागणार आहे.