युपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर! असा पहा……..

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झाले आहेत त्यांना आपला निकाल upsc.gov.in या आयोगाच्या अधिकृत वेबसाईट पाहता येईल.उत्तीर्ण उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.

परीक्षेच्या नियमानुसार, पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सिव्हिल सेवा (मुख्य) परीक्षा, २०२४ साठी स्वतंत्र अर्ज (DAF-I) करावा लागणार आहे. या अर्जाच्या तारखा आणि इतर महत्वाच्या सूचना आयोगाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर केले जाणार आहेत. पुढे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुलाखतीसाठी पात्र ठरतील.

युपीएससी पूर्वी परीक्षा १६ जून रोजी देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ४०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रकारचे दोन पेपर होते. युपीएससीनं परीक्षा घेण्यापूर्वीच जाहीर केलं होतं की, पूर्व परीक्षेतील जनरल स्टडिज पेपर २ मधील किमान ३३ टक्के बरोबर उत्तर आणि जनरल स्टडिज पेपर १ मधील एकूण गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) यांचा समावेश असेल.