इचलकरंजी महापालिकेकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची कार्यवाही सुरू

सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत आहे. महिलांना सक्षम, स्वावलंबी बनविणे हा त्यामागचा हेतू आहे. नुकतीच राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यांसाठी व आरोग्य, पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील निर्णायक भुमिका मजबुत करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली. पावसाळी अधिवेशनात घोषणा झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची इचलकरंजी महापालिकेकडून तातडीने कार्यवाही सुरु केली असून शहरातील महिलांना दिलासा मिळालेला आहे.

या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. १ जुलैपासून नोंदणी सुरु करण्यात आली असून १५ जुलैपर्यंत संपूर्ण शहरातील २१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेतून दरमहा दिड हजार रुपये थेट बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

नांव नोंदणीसाठी राज्य शासनाकडून सेतू सुविधा केंद्र तसेच शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या मार्फत अॅपद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
योजनेसाठी कागदपत्रे
• वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख
• आधार लिंक बँक खाते • आधार कार्ड रहिवाशी दाखला
.• जन्म दाखला
• कुटूंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
• पासपोर्ट आकाराचे फोटो • रेशन कार्ड • हमीपत्र