इचलकरंजी येथील एअरजेट कारखान्यास लागलेल्या आगीत दीड कोटीचे नुकसान

इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत असलेल्या एअरजेट कारखान्यास शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत कारखान्यातील संपूर्ण मशिनरी आणि दुसरे कारखान्यातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने तब्बल १ कोटी ६२ लाख ७० हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे. याबद्दल पंकजकुमार रामनारायण गट्टाणी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पंकजकुमार गट्टाणी यांचा शहापूर परिसरातील खंजिरे औद्योगिक वसाहतीत एअरजेट कारखाना आहे. या कारखान्यात ५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामध्ये २४ लाखाचे दोन एअरजेट मशिन, १६.५० लाखाचे तीन एअरजेट मशिन, ४५ लाखाचे एअरजेट मशिनवरील वायरींग व कॉम्प्रेसर, १५ लाखाचे डक्टींग, ६ लाखाचे सिलींग फॉल, ४.५० लाखाचे दोन बिम, १ लाखाचे वेफ्ट यार्न, ३ लाखाचे हिल्ड वर्पर / ड्रॉपर, ७० हजाराचे क्लॉथ रोल व २० लाखाचे रिड असे मिळून १ कोटी ६२ लाख ७० हजाराचे नुकसान झाले आहे.