सध्या पावसाळा सुरु झालेला आहे. सगळीकडेच पावसाची रिपरिप तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत राहतो. अलीकडेच कोल्हापूर हातकनंगले तसेच इचलकरंजी शहरात अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इचलकरंजी शहरात सध्या पावसाची रिपरिप सुरु झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डासांची पैदास वाढली असून यातून डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने डास प्रतिबंधक धुर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
डासांचा वाढला उपद्रव! धूर फवारणी करण्याची मागणी…
