तारदाळचे तलाठी कार्यालय हाऊसफुल्ल!

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी झाली. या योजनेअंतर्गत तलाठी कार्यालये फुल्ल झाले आहेत.

नुकत्याच सादरलेल्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रती महिना देण्याची घोषणा केल्यानंतर आता १ जुलै अर्ज भरण्यासाठी तारदाळ मधील महिलांनी एकच गर्दी चित्र दिसत होते.
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील तलाठी कार्यालयात सोमवारी सकाळीपासूनच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांनी खूपच गर्दी केलेली पाहायला मिळाली.

या अनुषंगाने तारदाळ ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच पल्लव्वी पवार यांनी तारदाळ-खोतवाडीचे तलाठी महेश साळवी यांना महिलांना वेळेत दाखल मिळावेत. या मागणीचे निवेदन देखील दिले आहे.