मदन कारंडे यांना मिळणार इंडिया आघाडीत मोठे स्थान, बैठकीत एकमत झाल्याची चर्चा

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे सर्वांनीच पहिले. तसेच अनेक पक्षप्रवेश देखील झाले. इचलकरंजी शहरात देखील अनेक राजकीय चित्र बदलली. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसारखी कामगिरी व्हावी अशा दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. मदन कारंडे यांना इंडिया आघाडीत मोठे स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या दोन्ही पक्षात मुंबईतील बैठकीत एकमत झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर प्रथमच इचलकरंजीत कारंडेंच्या रुपाने नेतृत्वाची मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.