अलीकडच्या काळात इचलकरंजी शहरांमध्ये खूपच चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे शहरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरांनी अनेक घरांवर डल्ला मारलेला आहे.
इचलकरंजी जवाहरनगर परिसरातील ठाकरे चौक, ओंकारनगर, तिवारी अपार्टमेंट, स्वामी अपार्टमेंट, इंदिरा कॉलनी, इरगोंडा पाटीलनगर, केटकाळेनगर, शिकलगार गल्ली, सूर्योदयनगर, भारतमाता हौसिंग सोसायटी, अष्टविनायकनगर आदी परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. या भागात पथदिवे नसल्याने अंधार असतो. त्यामुळेही चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.