लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. यामध्ये शनिवार (ता. १६) पर्यंत जिल्ह्यात ३७ लाख ५८ हजार ५१३ मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये १८ लाख ९७ हजार ३५६ पुरुष मतदार असून, १८ लाख २५ हजार ५९८ महिला मतदार आहेत.
तसेच १८० तृतीयपंथीय व्यक्तींची नोंद झाली आहे.यंदा १८ ते १९ वयोगटांतील ३९ हजार ६३३ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या आचारसंहितेची माहिती देण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली.जिल्हाधिकारी म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. गेल्या २४ तासांत शासकीय कार्यालयातील सर्व राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती काढण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक परिसरातील राजकीय पक्षांच्या जाहिरातील काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदारसंघ -मतदान केंद्रे -पुरुष -स्त्री – तृतीयपंथी – एकूण
शाहूवाडी – ३३३- १ लाख ५१ हजार ८९४ -१ लाख ४१ हजार ७६२- ३ -२ लाख ९३ हजार ६५९
हातकणंगले- ३३१ -१ लाख ६८ हजार ७८६ -१ लाख ६० हजार ९४१ -१८ – ३ लाख २९ हजार ७४६
इचलकरंजी -२५५ -१ लाख ५२ हजार ८४२ -१ लाख ४५ हजार ३९६ – ६० -२ लाख ९८ हजार २९८
शिरोळ – २९३ -१ लाख ५७ हजार ६२५- १ लाख ५७ हजार २५२- २ – ३ लाख १४ हजार ८७९
इस्लामपूर -२८४ -१ लाख ३६ हजार ८७४ – १ लाख ३२ हजार २३३ -४ -२ लाख ६९ हजार १११
शिराळा – ३६४ -१ लाख ५१ हजार ६२४ -१ लाख ४३ हजार ८८२ -४ -२ लाख ९५ हजार ५१०
एकूण -१८६० -९ लाख १९ हजार ६४६ -८ लाख ८१ हजार ४६६- ९१ -१८ लाख १ हजार २०३